
Panjab Dakh Weather Forecast For August 2023 | पंजाबराव डख यांचा ऑगस्ट महिन्यातील पावसाचा नवीन अंदाज.
Weather Forecast :- पंजाबराव डख यांचा ऑगस्ट महिन्यात होण्याऱ्या पावसासंदर्भातला नवीन अंदाज आला आहे. पंजाबराव डख यांचे बहुतांश अंदाज खरे होत असल्याचा शेतकऱ्यांचा विश्वास आहे.
त्यामुळे राज्यातील शेतकरी पंजाबराव डख यांच्या अंदाजाची चातकाप्रमाणे वाट बगत असतात. पंजाबराव डख यांनी ऑगस्ट महिन्यात सोबतच सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसासंदर्भात माहिती दिली आहे.
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात पावसाने विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पाऊस कधीपासून पुनः चालू होणार याबद्दल चिंता लागलेली आहे.
हवामान अंदाज महाराष्ट्र
पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात 16,17 ऑगस्ट पासून पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात 30 ऑगस्ट पर्यन्त जोरदार पाऊस होण्याचा अंदाज सुद्धा त्यांनी वर्तविला आहे.
यामध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस होण्याचा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.
पंजाबराव डख यांच्या मते पुढील अडीच महीने पाऊस राहणार आहे, यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात जास्त पाऊस राहणार आहे सोबतच ऑक्टोबर मध्ये सुद्धा अशीच परिस्थिति राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी दिला आहे.