PM Kisan 14th Installment | पीएम किसान चा 14वां हफ्ता नाही आला तर 15 ऑगस्ट पर्यंत ही काम करा
PM Kisan :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै रोजी पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पीएम किसान चा 14वां हफ्ता एका क्लिक वर वर्ग केला आहे.
पण अजूनही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान चा 14वां हफ्ता नाही आला.
केंद्र शासनाच्या मूळ नोंदीमद्धे राज्यातील शेतकऱ्यांची संख्या 1 कोटी 17 लाख नमूद करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेमद्धे लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने केलेले निकष पाहिल्यास या योजनेमद्धे पात्र शेतकऱ्यांची संख्या 97 लाख आहे.
या 97 लाख शेतकऱ्यापैकी 12 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान चा 14वां हफ्ता अजूनही मिळालेला नाही.
पीएम किसान योजनेच्या लाभापासून वरील 12 लाख शेतकरी वंचित राहू नये म्हणून कृषि मंत्र्यांनी कृषि आयुक्तालयाला पत्र पाठवून चिंता व्यक्त केली आहे. यासाठी तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी व भूमी अभिलेख अधिकारी यांनी तालुका पातळीवर मोहीम घ्यावी असे आदेश सरकारने दिले आहे.
सोबतच या 12 लाख शेतकऱ्यांपर्यंत कृषिसेवक, ग्रामसेवक व तलाठ्याने जावे व या योजनेच्या कक्षेत आणावे.
सोबतच वंचित शेतकऱ्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत तहसीलदार, भूमी अभिलेख अधिकारी आणि कृषि अधिकारी यांच्या संनियंत्रण समितीशी संपर्क साधून आवश्यक अटींची पूर्तता करून घेण्याचे आवाहन कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.