Wildlife Compensation 2023 | वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास आता 25 लाख रुपयांची मदत. Vanyaprani Nuksan Bharpai 2023
Forest Department :- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास आता त्याच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, मगर, कोल्हा, हत्ती, रानकुत्रे, रोही व माकड यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार संबंधितांना अर्थसहाय्य अदा करण्यात येते.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू , अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी झाल्यास द्यावयाच्या अर्थसहाय्य मध्ये 25 लाख रुपये पर्यन्त वाढ करण्यात आल्याची माहिती राज्याचे वनेमंत्री श्री सुधीर मुंंनगंटीवार यांनी विधानसभेत दिली आहे.
वन्यप्राणी नुकसान भरपाई 2023
या संदर्भातला शासन निर्णय 3 ऑगस्ट 2023 रोजी निगर्मित करण्यात आला आहे. याआधी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जायची. पण यामध्ये आता वाढ करून 25 लाख रुपये करण्यात आली आहे.
या साठी वनविभाग शासन निर्णय हा 3 ऑगस्ट 2023 अन्वये निर्णय घेण्यात आला आहे.
👉वनविभाग शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक कर👈