
Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana
Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana :- नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज बघणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेचा जो जी. आर. आला आहे. सोबतच या योजनेचा शेतकऱ्यांना कसा काय फायदा होईल ते.
राज्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असणारा घटक त्याला मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करून दिल्यास त्याचा शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
त्यामुळे मा. वित्त मंत्र्यांनी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषनेनुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षीयात मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करून मागेल त्याला फळबाग, ठिबक/तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्यांचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्र/BBF, कॉटन श्रेडर देण्याबाबत मागेल त्याला शेततळे या योजनेचा विस्तारीत योजनेस संदर्भाधीन शासन परीपत्रकान्वये मान्यता देण्यात आली.
Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana
कृषि क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्ती निमित्त मागेल त्याला फळबाग, ठिबक/तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्यांचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरनियंत्रे आणि कॉटन श्रेडर देणे या विस्तारीत योजनेस ‘छत्रपती शिवाजी महाराजी कृषि योजना’ Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana असे नाव देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
कृषि विभागामार्फत सन 2023-24 करीता राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला फळबाग, ठिबक/तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्यांचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरनियंत्रे आणि कॉटन श्रेडर देणे या विस्तारीत योजनेस या शासन निर्णयाद्वारे “छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना” असे नाव देण्यात येत आहे.
या शासन निर्णयाद्वारे फक्त मुळ योजनेस “छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना” असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निगर्मित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे लागू राहतील.