Cyclone Michaung Alert | देशावर अवकाळीचं संकट; येत्या 48 तासांत चक्रीवादळ धडकणार ! या राज्यांना मुसळधारेचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100

Cyclone Michaung Alert

Cyclone Michaung Alert

Cyclone Michaung Alert:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार अवकाळी पावसाचा तडाखा बसताना बघायला मिळत आहे.

राज्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतिपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशातच पुन्हा एकदा देशातील बहुतांश भागात अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

देशासह राज्यातील वातावरणात मोठा बदल घडताना बघायला मिळत आहे, यामध्ये आता पुढील 48 तासांत देशाच्या पुर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचे रुपांतर हे तीव्र कमी दाबात झाले आहे.

Cyclone Michaung Alert

या कमी दाबाचं मार्गक्रमण हे बंगालच्या उपसागरात पश्चिम वायव्य दिशेने होण्याची शक्यता आहे.

साधारण 2 डिसेंबर पर्यंत नैऋत्य आणि लगतच्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं रुपांतर ‘मिचांग’ चक्रीवादळात Cyclone Michaung Alert होण्याची मिचांग चक्रीवादळामुशक्यता वर्तवली आहे.

या ‘मिचांग’ चक्रीवादळाचा परिणामस्वरूप अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा 👉Rabi Crop Insurance Last Date 2023 | रब्बी पिकांचा पीक विमा भरण्यासाठी ही आहे शेवटची तारीख ; आपण पीक विमा भरला नसेल तर लगेच भरा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर रोजी वादळी पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

मिचांग चक्रीवादळामुळे अंदमान निकोबार बेटांवर 30 नोव्हेंबर रोजी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी 1 ते 3 डिसेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सोबतच आंध्रप्रदेश किनारपट्टी भागात बहुतांश ठिकाणी 2 ते 4 डिसेंबर दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

👉Pik Nuksan Bharpai Nidhi 2023 | अवकाळीने नुकसान झालेल्या तालुक्यांची यादी जाहीर! नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.

Leave a Comment