Namo Shettale Abhiyan | नमो शेततळे योजना; या शेतकऱ्यांना मिळणार 7300 शेततळ्यांचा लाभ

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
79 / 100

Namo Shettale Abhiyan

Namo Shettale Abhiyan

Namo Shettale Abhiyan :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत की ‘नमो शेततळे अभियान’ ही योजना काय आहे ते आणि या योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार ते.

राज्यातील 82% शेती ही कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे होणारे आसमान वितरण आणि पावसामद्धे येणारे मोठे खंड या प्रमुख नैसर्गिक अडचणीवर मात करण्यासाठी शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करून पाण्याची साठवणूक करणे.

Namo Shettale Abhiyan

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढविणे त्याचप्रमाणे शेतीला पूरक मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारता यावे याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देण्याच्या अनुषंगाने मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्यां वाढदिवसानिमित्त राज्यात राबविण्यात येत असलेल्या नमो 11 सूत्री कार्यक्रमांतर्गत “नमो शेततळे अभियान” Namo Shettale Abhiyan राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्यां वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या नमो 11 सूत्री कार्यक्रमांतर्गत राज्यात “नमो शेततळे अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गत राज्यात 7300 शेततळे उभारण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेच्या मागेल त्याला शेततळे या घटकांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळ्यांचा समावेश सदर अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळ्यांमद्धे करण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेअंतर्गत मागेल त्याला शेततळे या घटकाकरीता उपलब्ध निधीतून नमो शेततळे अभियान राबविण्यात येणार.

हे पण वाचा 👉Dushkal Yadi 2023 Maharashtra | राज्यातील 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर; आपला तालुका जाहीर झाला का
हे पण वाचा 👉Chatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana | छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना जी.आर. आला | मागेल त्याला योजना शासन निर्णय

 

Leave a Comment