Karjmafi List 2024 Maharashtra
Karjmafi List 2024 Maharashtra:- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेत राज्यातील या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशी घोषणा केली आहे, तर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ते आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
राज्यात यावर्षी काही जिल्ह्यात अतिवृष्टी तर काही जिल्ह्यात दुष्काळ बघायला मिळत आहे, व गेल्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज कर्जमाफी संदर्भात केलेल्या घोषणेमुळे राज्यातील काही शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
Karjmafi List 2024 Maharashtra
सन 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संबंधित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती. या योजनेत 1 एप्रिल 2012 ते 30 जून 2016 या कालावधीतील दीड लाख रुपये पर्यंतचे कर्ज सरसकट Karjmafi List 2024 Maharashtra माफ करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता.
या योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे, परंतु राज्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. आता त्यासंबंधी एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.
आज 18 डिसेंबर 2023 रोजी सभागृहात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमद्धे’ 44 लाख शेतकऱ्यांना 18 हजार 762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असं मुख्यमंत्री म्हणाले.
मात्र सॉफ्टवेअरमध्ये त्रुटि निर्माण झाल्याने 6 लाख 56 हजार शेतकरी कर्ज माफीपासून वंचित राहिले होते, अश्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात केली आहे, त्यामुळे जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहिले होते अश्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.