Paddy bonus maharashtra
Paddy bonus maharashtra:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसाणीकरीता 1757 कोटी रुपये वितरित करण्यात येणार असून आतापर्यंत त्यापैकी 300 कोटी पेक्ष्या जास्तीचे वाटप देखील झालेले आहे.
सोबतच गेल्या दीड वर्षात राज्य सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तब्बल 44 हजार 278 कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सच पुनर्गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Paddy bonus maharashtra
शेतीला शाश्वत शेतीकडे कसं नेता येईल, राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल, अवकाळी पाऊस आला किंवा दुष्काळ पडला तरी शेतीचं नुकसान होणार नाही, असं शेतीचं मॉडेल कसं विकसित करता येईल, यासाठी हा टास्क फोर्स काम करील.
हे पण वाचा 👉Karjmafi List 2024 Maharashtra | मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! राज्यातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी ; तुमचे कर्जमाफ होणार का ?
धान उत्पादक Paddy bonus maharashtra शेतकऱ्यांना यावर्षी प्रती हेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे.
मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे विधानसभेत बोलताना म्हणाले की आम्ही धानाच्या नुकसानीची पाहणी केली आहे. यावर्षी अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना 20 हजार रुपये बोनस जाहीर करीत आहोत व त्यासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.
सन 2022-23 मध्ये प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रमाणे धानाचा बोनस देण्यात आला होता. यामध्ये 4 लाख 80 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. सदरचा लाभ प्रती शेतकरी जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यन्त देण्यात आला होता