PM Kisan Yojana List 2024
PM Kisan Yojana List 2024:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान चा 15 वां हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15 नोव्हेंबर रोजी वर्ग करण्यात आला आहे.
मात्र ई-केवायशी व आधार सीडींग झाली नसल्याने राज्यातील हजारो शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागत आहे, यामध्ये खासकरून अनेक जेष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने त्यांना लाभ मिळत नसल्याच्या ही तक्रारी आहे.
केंद्र सरकार काही दिवस अगोदर रु. 2000/- चा 16 वां हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करेल, कारण 2024 च्या मार्च-एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणूका होणार असून, त्यापूर्वी आचारसंहिता लागू होईल.
PM Kisan Yojana List 2024
लोकसभेच्या निवडणूक कार्यक्रम असल्याने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 16 व्या हप्त्याचे पैसे येणे शक्य मानले जात आहे, केंद्र सरकारने हप्त्याचे पैसे बँक खात्यात पाठवण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्टस नुसार फेब्रुवारीपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे.
👉Water Pump Auto Switch | तुमच्या कृषि पंपाना ऑटो स्विच लावली आहे का ? महावीतरणचा कारवाईचा इशारा ; काय बातमी आहे एकदा बघा
त्यामुळे पीएम किसानचा PM Kisan Yojana List 2024 16 वां हप्ता येण्यापूर्वी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी वेळीच शेतकऱ्यांनी ई-केवायशी व आधार सीडींग करून घेणे गरजेचे आहे.
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 15 वां हप्ता मिळाला आहे त्यांना 16 वां हप्ता मिळणारच आहे पण जे शेतकरी 15 व्यां हप्त्यापासून वंचित राहिले त्यांनी वेळीच आधार सीडींग व ई-केवायशी केली नाही तर आपल्याला पीएम किसानचा 16 वां हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते.