Ativrushti Nukasn Bharpai List 2024
Ativrushti Nukasn Bharpai List 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या लेखात आपण बघणार आहोत की कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणर ते.
राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. त्याप्रमाने विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाणे वेळोवेळी निधी वितरीत करण्यात आला आहे.
तथापि, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावावर कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शेतीपिकांच्या व इतर नुकसानीसाठी Ativrushti Nukasn Bharpai List 2024 आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाने सर्व विभागीय आयुक्त यांचे कडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार वर नमूद दि.05.06.2023 च्या शासन निर्णयाव्दारे रु.40170.70 लक्ष इतक्या रक्कमेच्या निधी वापरास मान्यता देण्यात आलेली आहे.
Ativrushti Nukasn Bharpai List 2024
तथापि, त्यानंतरही सर्व विभागीय आयुक्त यांचेकडुन संदर्भाधीन क्र.7 ते 31 येथील पत्रान्वये प्राप्त झालेले निधी मागणीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रस्ताव मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या दि.02.11.2023 रोजी झालेल्या बैठकीत निर्णयार्थ ठेवण्यात आले होते. या बैठकीतील निर्णयानुसार बाधितांना मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
👉Weather Update For 25 February 2024 | तो पुनः येतोय ! हवामान खात्याचा या 15 जिल्ह्यांना मुसळधार वादळी पावसाचा इशारा ; आपल्या जिल्ह्यात होणार का पाऊस ?👈
सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरीता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकूण रू.10664.94 लक्ष (रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट्ट लक्ष चौऱ्यान्नव हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.