Dushkal Nuksan Bharpai List 2024 | दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांतिल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार ; शासन निर्णय जाहीर !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Dushkal Nuksan Bharpai List 2024

Dushkal Nuksan Bharpai List 2024

Dushkal Nuksan Bharpai List 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्य शासनाकडून 31 ऑक्टोबर च्या शासन निर्णयान्वये राज्यातील 40 तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित केले होते, त्यानुसार त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे तर त्यासंदर्भात माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

शासन निर्णयान्वये राज्यातील 40 तालुक्यांमध्ये खरीप 2023 हंगामाकरीता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या परीच्छेद 4 मधील तरतूदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे.

त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरीता 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टर मर्यादेत निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, छ.संभाजीनगर, अमरावती यांना देण्यात आल्या होत्या.

Dushkal Nuksan Bharpai List 2024

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

खरीप हंगाम-2023 मधील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता वर नमूद अ.क्र.6 ते 11 येथील पत्रांव्दारे विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत.

👉Weather Update For 1st March | पुढील 48 तासांत इतक्या जिल्ह्यात वादळी गारपीटीचा इशारा ! हवामान खात्याचा या जिल्ह्यांना अलर्ट जाहीर.👈

खरीप हंगाम-2023 करीता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निपिष्ठा अनुदान वाटप करण्याकरीता वर नमूद क्र.2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रु.244322.71 लक्ष (अक्षरी रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

Dushkal Nuksan Bharpai List 2024

शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.27.03.2023 व दि.09.11.2023 नुसार जीरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार पांवसाळी हंगाम2023 मध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी.

 

संबंधित शासन निर्णय इथे पहा 

 

Leave a Comment