Havaman Andaj Today
Havaman Andaj Today :- राज्यात गेल्या 2 दिवसापासून वातावरणात बदल झालेला बघायला मिळत आहे, त्यात कुठे थंडी तर कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस पहावयास मिळत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या पुढील 24 तासात विदर्भात वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस सोबतच बहुतांश ठिकाणी गारपिट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
काल दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी विदर्भातील वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजांच्या कडकडाटासह पाऊस व गारपिट झालेली आहे.
Havaman Andaj Today
यामध्ये खासकरून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, माढेळी, टेमुर्डा, भद्रावती परिसरात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. परिणामी रब्बीतिल काढणीला आलेल्या हरभरा, गहू, ज्वारी यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी Havaman Andaj Today वादळी पाऊस व गारपिट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसासोबत गारपिटीची शक्यता आहे.
सोबतच अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी स्वरूपाचा हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे.