Incentive Bonus
Incentive Bonus :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून आज दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी एक GR काढन्यात आला आहे, त्याद्वारे राज्यातील काही पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस महणून प्रती हेक्टरी रु. 20,000/- देण्यात येणार आहे तर त्यासंदर्भातच या लेखात आपण माहिती जाणून घेणार आहोत.
खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरीता प्रती हेक्टरी रू.20000/- याप्रमाणे (दोन हेक्टरच्या मर्यादेत) प्रोत्साहनपर राशी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
किमान आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत, खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये, केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरीता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी रू.20000/- याप्रमाणे (दोन हेक्टरच्या मर्यादेत) प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येईल.
Incentive Bonus
- वरील अतिरिक्त प्रोत्साहनपर राशी केवळ पणन हंगाम 2023-24 मधील खरीप धान पिकविण्याऱ्या शेतकऱ्यांकरीताच लागू राहील.
- खरीप पणन हंगाम 2023-24 मधील किमान आधारभूत किमतीवर प्रोत्साहनपर राशी द्यायची असल्याने, पणन हंगाम 2023-24 साठी धान/भरडधान्य खरेदीबाबतच्या संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सिग अटी व शर्तीनुसारच शेतकरी नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी.
- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकाऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई-पीक पाहणीद्वारे खातर जमा करून जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहील.
- शेतकऱ्यांना (धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरीता प्रती हेक्टरी रू.20000/- प्रमाणे प्रोत्साहनपर राशी Incentive Bonus केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातूनच वाटप करण्यात यावी.
👉Imd Alert For 26 February | अस्मानी संकटाच सावट ! उद्या या 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर.👈
- धान उत्पादक शेतकरी हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थाकडून सुरु केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असला पाहीजे.
- प्रोत्साहनपर राशीस पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही.
- शेतकऱ्याने सादर केलेला 7/12 चा उतारा त्यावरील धान लागवडीखालील जमीनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर राशीची रक्कम निश्चित करण्यात यावी. यासाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या ई-पीक पाहणी ॲपद्वारे संकलित केलेल्या माहितीचा आधार घेण्यात यावा.
- एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थाकडे नोंदणीकृत असल्यास, त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) त्यास प्रोत्साहनपर राशी देय राहील.
- नोंदणीकृत शेतकऱ्याव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रोत्साहनपर राशी अदा केल्याच्या कोणत्याही तक्रारी शासनास प्राप्त झाल्यास संबंधित अभिकर्ता संस्थांनी याकरिता जबाबदार अधिकारी/ कर्मचारी यांचेकिरुध्द कठोर कार्यवाही करावी.
- वरीलप्रमाणे प्रोत्साहनपर राशी अदा करण्याकरीता खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये येणाऱ्या अंदाजे रु.1600.00 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा