Kanda Anudan Yojana 2024
Kanda Anudan Yojana 2024 :- नमस्कार शेतकरी बंधुनो, राज्य सरकारकडून दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 350 रुपये प्रती क्विंटल या दराने अनुदान जाहीर करणारा GR काढण्यात आला आहे.
राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यामध्ये, खाजगी बाजार समित्यामध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 नुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये 350 प्रती क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी
याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या रू. 301, 66 ,93,000/- ( रू. 301 कोटी, 66 लाख, 93 हजार फक्त ) इतक्या निधीपैकी 70 टक्के मर्यादेत रु.211.16 कोटी ( अक्षरी रूपये 211 कोटी 66 लाख फक्त ) इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे.
Kanda Anudan Yojana 2024
या योजनेअंतर्गत, कांदा अनुदानासंदर्भात रू.10.00 कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक 10 जिल्ह्यातील लाभार्थ्याची देय अनुदानाची रक्कम रू. 24,000/- पेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम,दुसरा व तृतीय टप्प्यात रु. 24,000/- इतक्या कमाल मर्यादेत अनुदान Kanda Anudan Yojana 2024 वितरीत करण्यात आले आहे, अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा खालीलप्रमाणे वितरित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा👉Weather Update | पुढचे 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे ! वादळी वाऱ्यासह तूफान अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा
ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रु. 44,000/- पेक्षा कमी आहे त्यांचेप्रकरणी संपुर्ण अनुदानाची रक्कम ( प्रथम,दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले रु. 24,000/- अनुदान अंतर्भूत करुन ) अदा करण्यात यावी. तसेच ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रु.44,000/- अथवा रू. 44,000/-पेक्षा जास्त आहे, (प्रथम,दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले रु. 24,000 /-अनुदान अंतर्भूत करुन) त्यांचेप्रकरणी चौथ्या टप्प्यात रू. 20,000/- (अक्षरी रूपये वीस हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी.