Mukhyamantri Vayoshri Yojana | ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’, राज्य शासनाकडून या नागरिकांना रु. 3000/- मिळणार

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana :- नमस्कार मित्रहो, काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राज्यात राबविण्यास मंजूरी देण्यात आली आहे, तरी राज्यातील कोणत्या नागरिकांना व या योजनेचा कोणता फायदा होणार आहे ते आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असणाऱ्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ होईल. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल.

Mukhyamantri Vayoshri Yojana

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाईल. यासाठी आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

या योजनेसाठी ४८० कोटी रुपयांच्या खर्चास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दिड कोटींच्या दरम्यान आहे. त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वास्थ्याने पिडीत सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल. केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते. मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना Mukhyamantri Vayoshri Yojana राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल.

👉हे पण वाचा Avakali Nuksan Bharpai Yadi 2024 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई मंजूर ; GR आला

Leave a Comment