Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 :- नमस्कार मित्रहो, राज्य शासनाने राज्यातील नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ जाहीर केली होती, तर या योजनेत अर्ज कुठे करायचा, योजनेची पात्रता काय? कागदपत्रे कोणती लागणार आहे ते आपण या लेखात बघणार आहोत.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदीन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करनेकरीता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबिवण्यास मा. मंत्रीमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे.
सदर योजनेचे ध्येय व उदिष्ट :-
राज्यातील 6 5 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदीन जीवनात Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांंना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरीता एकवेळ एकरकमी रु. 3000/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणाळीद्वारे लाभ प्रदान करणे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
1. आधार कार्ड /मतदान कार्ड
2 . राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
3 . पासपोर्ट आकाराचे २ फोटो
४ . स्वयघोषणा पत्र
5 . शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे