Unseasonal Rain 2024
Unseasonal Rain 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरणात बदल होताना बघायला मिळत आहे, अशातच हवामान खात्याने राज्यात 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ झालेली बघायला मिळत आहे तर उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झालेली पाहावयास मिळत आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार राज्यातील विदर्भ व मराठवाडा प्रदेशात 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Unseasonal Rain 2024
राज्यातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यात मुख्यता ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम अवकाळी Unseasonal Rain 2024 पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
सोबतच बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, सोलापूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.