Weather Update
Weather Update :- गेल्या काही दिवसापासून राज्यातिल तापमानात चढ-उतार बघायला मिळत आहे, सोबतच राज्यात पुढील काही दिवस वादळी पाऊस होणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 48 तासात म्हणजेच 10, 11 फेब्रुवारी रोजी विदर्भ मराठवाड्याच्या लगतच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
Weather Update
शनिवारी गडगडाटी वादळा सोबत वीजांचा कडकडाटासह जालना, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे, सोबतच यावेळेस वाऱ्यांचा तासी वेग हा 30-40 की. मी. राहण्याची शक्यता आहे.
IMD Alert For Maharashtra
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तासात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अकोला,बुलढाणा, अमरावती, वाशिम, जालना, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस Weather Update होण्याची शक्यता आहे, नांदेड, लातूर या जिल्ह्यात सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे.