Weather Update For 1st March
Weather Update For 1st March :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसापासून वातावरणात बदल झालेला असून बहुतांश जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस व गारपीट पाहायला मिळत आहे.
सोबतच हवामान खात्याने पुढील तीन दिवस राज्यात वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. यावेळेस बहुतेक जिल्ह्यात गारपीटीचा इशारा दिलेला आहे.
गेल्या 24 तासात विदर्भातील काही जिल्ह्यात तर खांदेशसह मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी जोराची गारपीट बघावयास मिळाली आहे.
Weather Update For 1st March
अशातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 48 ते 72 तासात बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिट होण्याचा अंदाज आहे.
दिनांक 29 फेब्रुवारी रोजी धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या ठिकाणी वादळी पाऊस व गारपिट होण्याची शक्यता वर्तविली आहे. तर नंदुरबार, जालना, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यात सुद्धा वादळी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
👉Mansoon 2024 Prediction | ला-निनामुळे यावर्षीचा मान्सून धो-धो बरसणार ! El Nino जाऊन La-Nina येणार का ?👈
1 मार्च 2024 रोजी Weather Update For 1st March धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना विशेष वादळी गारपिटीचा इशारा देण्यात आलेला असून नंदुरबार, नाशिक, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, हिंगोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट देऊन पावसासह गरपीटीची शक्यता वर्तविली आहे.
सोबतच 2 मार्च रोजी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी,जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला असून या ठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे, सोबतच बीड, वाशिम, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.