Anandacha Shidha Gudi Padva 2024
Anandacha Shidha Gudi Padva 2024 :- नमस्कार मित्रहो, राज्यातील रेशनकार्ड धारकांना येणाऱ्या गुडीपाडवा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2024 इ. सणानिमित्य आनंदाचा शिधा च्या माध्यमातून 100 रुपयात या 4 वस्तु देण्यात येणार आहे.
लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सणासुदीच्या काळात सवलतीच्या दरात खाद्यवस्तु उपलब्ध करून देण्याकरीता सन 2022 च्या दिवाळी सन 2023 च्या गुडीपाडवा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ., गौरी-गणपती उत्सव, दिवाळी सणांनिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर या परिमानात खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला 1 संच (आनंदाचा शिधा) ₹ 100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने विहित करण्यात आला आहे.
सद्यस्स्थितीत राज्यात श्री राम प्राणप्रतिष्ट्ठा सोहळा-छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त “आनंदाचा शिधा” चे वितरण सुरू आहे. त्याचधर्तीवर दि.14.02.2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार उपरोक्त पात्र शिधापत्रिकाधारकांना सन 2024 च्या गुडीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणांनिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमानात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर या परिमानात सोयाबीं तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला “आनंदाचा शिधा” ई-पास प्रणालीद्वारे ₹ 100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
Anandacha Shidha Gudi Padva 2024
- लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी अश्या एकूण 1,69,24,637 शिधापत्रिकाधारकांना आगामी गुडीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणानिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमानात रवा,चणादाळ,साखर व 1 लिटर या परिमानात सोयाबीं तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” खरेदी करण्याकरिता Mahatenders या ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
👉Weather Update For 16 to 20 March | पुनः वादळी गारपिट ; या जिल्ह्यांना मोठा फटका बसणार ! हवामान खातं काय म्हणते पहा अंदाज ?👈
- सदर “आनंदाचा शिधा” शिधाजिन्नस संच खरेदि करण्याकरिता निविदा प्रक्रियेअंती गुनिना कमर्शिअल्स प्रायव्हेट लिमीटेड, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या न्यूनतम दराने उपरोक्त शिधाजिन्नस संच Anandacha Shidha Gudi Padva 2024 खरेदी करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
- माहे मार्च 2024 मध्ये लागू होणारी आचार संहिता विचारात घेता, सदर आचार संहितेच्या कालावधीमध्ये प्रस्तावित 4 शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” प्रतीशिधापत्रिका 1 याप्रमाने ई-पॉसद्वारे राज्यातील पात्र लाभार्थ्यांंना ₹100/- प्राइसनच या सवलतीच्या दराने उपरोक्त सणांकरिता वितरित करण्यास सामान्य प्रशासन विभागाच्या दि.28.02.2024 च्या शासन परीपत्रकान्वये गठित छाननी सनितीची शिफारस व त्याअनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या अधिंन राहून मान्यता देण्यात येत आहे.