Crop Insurance List 2024 Update | पिकविम्याचे 83 कोटी रुपये सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ! यादीमध्ये नाव पहा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Crop Insurance List 2024 Update

Crop Insurance List 2024 Update

Crop Insurance List 2024 Update :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना 83 कोटी रुपयांचे पिकविम्याचे वाटप करण्यात आले आहेत तर आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत की कुठल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती पीकविमा मिळाला आहेत ते.

यावर्षी पिकविम्याच्या नुकसानभरपाईवरुण शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी अनेकदा आक्रमक झाले. मात्र सर्वसाधारण पीकविमा मिळाला नाही. तरीही काढणीपश्चात नुकसान,स्थानिक आपत्तितिल नुकसाणीबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर मंजूर झालेल्या क्लेमपोटी 1.23 लाख शेतकऱ्यांना 83 कोटी 65 लाख वाटप झाले. अजून 25 हजारावर शेतकरी शिल्लक आहे.

हिंगोली जिल्ह्यात 2023 च्या खरीप हंगामात निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला, सुरुवातीलाच अतिवृष्टी झाली. त्यानंतर मध्येच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची पिके वाळू लागली होती.

Crop Insurance List 2024 Update

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

पुनः अतिवृष्टी झाल्याने पिके थेट पाण्याखाली गेली, त्यानंतर पुनः काढणीत पावसाने घाण केल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न झाले नाही. परींनामी शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही.

ज्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने केल्या अश्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळत नव्हती. यासाठीही कंपनीची चालढकल सुरू होती.

मात्र शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होण्याची शक्यता दिसू लागताच कंपनी व कृषि विभागही जागा झाला. पीकविमा अदा Crop Insurance List 2024 Update करणे सुरू झाले, सोबतच 83 कोटी रुपयांचे वाटपही केले.

👉Regular Crop Loan Waiver 2024 | राज्य शासनाचा मोठा निर्णय ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रु. 50000/- ची मदत.👈

काढणीपश्चात नुकसाणीचे 8.43 कोटी 

  • खरीप 2023 मध्ये काढणीपश्चातही पीक नुकसान झाल्याच्या 9512 तक्रारी होत्या.
  • यात औंढा 2220, वसमत 3169, हिंगोली 1111, कळमपुरी 1417, सेनगाव 1595, यांचा समावेश आहे. यातील 8 हजार 621 जणांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा झाली आहे.
  • यात औंढा तालुक्यात 1805 जणांना 1.29 कोटी, वसमतला 2816 जणांना 2.78 कोटी, हिगोलीत 1046 जणांना 88.79 लाख, कळमपुरीत 1325 जणांना 1.67 कोटी, सेनगावात 1629 जणांना 1.78 कोटी रुपये वितरित झाले आहे.

रब्बी हंगामातही तक्रारी 

  • 2023-24 च्या रब्बी हंगामातही स्थानिक आपत्तित 5877, तर काढणीपश्चात नुकसाणीच्या 7228 तक्रारी आहेत.
  • यात स्थानिकांमध्ये औंढा 1880, वसमत 980, हिंगोली 297, कळमपुरी 2312, सेनगाव 408 अश्या तक्रारी आहेत.
  • तर काढणीपश्चातच्या औंढा 2553, वसमत 217, हिंगोली 399, कळमपुरी 3723, सेनगाव 336 अशा 7228 तक्रारी विमा कंपनीकडे ऑनलाइन सदर झाल्या आहेत.

Leave a Comment