Gharkul Yadi 2024 Maharashtra | या जिल्ह्यातील घरकुल मंजूर ; लाभार्थी यादी इथे तपासा ! GR आला

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Gharkul Yadi 2024 Maharashtra

Gharkul Yadi 2024 Maharashtra

Gharkul Yadi 2024 Maharashtra :- नमस्कार मित्रहो, आपण जर घरकुल योजेनेसाठी अर्ज केला असेल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण घरकुल योजनेचा एक शासन निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1 व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. 2 ते 4 मधील तरतुदींनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, जालना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने दि.16.02.2024 रोजीच्या आदेशान्वये प्रशासकीय मान्यता दिलेल्या जालना जिल्यातील वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.6 येथील पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

Gharkul Yadi 2024 Maharashtra

सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सन 2023-24 करीता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजना जिल्हास्तरीय समिति, जालना यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने दि.16.02.2024 रोजीच्या आदेशान्वये प्रशासकीय मान्यता दिलेल्या वैयक्तिक घरकुल Gharkul Yadi 2024 Maharashtra लाभार्थ्यांपैकी खालील नमूद करण्यात आलेल्या जालना जिल्यातील 7288 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना काऱ्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरीता प्रती लाभार्थी रु.1.20 लक्ष प्रमाणे रु.87,45,60,000/- (अक्षरी रुपये स्याऐंशी कोटी पंचेचाळीस लक्ष साठ हजार फक्त)

👉Reshim Udyog Yojana 2024 Maharashtra | रेशीम उद्योग शेडसाठी आता सरकार देणार 40 लाख रुपये अनुदान ! शासन निर्णय पहा.👈

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

व 4 टक्के प्रशासकीय निधी (प्रती घरकुल रु.4800/- प्रमाणे) रु.3,49,82,400/-(अक्षरी रुपये तीन कोटी एकोणपन्नास लक्ष ब्याऐंशी हजार चारशेफक्त) अशा एकूण रु.90,95,42,400/- (अक्षरी रुपये नव्वद कोटी पंच्यान्नव लक्ष बेचाळीस हजार चारशे फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रू.18,00,00,000/- (अक्षरी रूपये अठरा कोटी फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील बदनापुर, अंबड, भोकरदण आणि जाफराबाद या 4 तालुक्यातील 7288 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांंना मंजूरी देण्यात आली आहे.

घरकुल लाभार्थी यादी पाहण्यासाठी लिंक ला क्लिक करा 

Leave a Comment