Havaman Andaj Today
Havaman Andaj Today :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात पुढील 2 दिवस जोरदार अवकाळी पाऊस व गारपिट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
मित्रहो गेले 2 दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसलेला पाहायला मिळत आहे, बहुतांश ठिकाणी गारपिटीने पिकांचे नुकसान सुद्धा झाले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 19 व 20 मार्च रोजी विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता आहे.
Havaman Andaj Today
दिनांक 19 मार्च रोजी चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीजांचा कडकडाटासह गारपिट होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
👉Loan Waiver List 2024 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या शेतकऱ्यांची कर्जमाफी माफी झाली ; नवीन शासन निर्णय आला.👈
तर गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दिनांक 20 मार्च रोजी नांदेड, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या ठिकाणी वादळी वाऱ्यासह Havaman Andaj Today हलका ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.