Loan Waiver List 2024 Update
Loan Waiver List 2024 Update :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यासाठी आठवड्याभरात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्जमाफी संदर्भातली बातमी अशी आहे की तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सन 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) राबविण्यात आली होती.
सदर कर्जमाफी योजनेत 6 लाख शेतकरी पात्र ठरून सुद्धा कर्जमाफीचा लाभ त्या 6 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही, दरम्यान या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात केली होती.
Loan Waiver List 2024 Update
सन 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना महाऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात आली होती. दरम्यान महाऑनलाइन पोर्टल बंद होऊन महाआयटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महाऑनलाइन पोर्टलवरील 6 लाख शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा तपशील आताच्या महाआयटीला खटपट करूनही मिळत नाही. त्यामुळे महाऑनलाइनचा डाटा आपण पुनर्रस्थापित करू शकत नाही असे पत्र आयटी विभागाच्या प्रधान सचिवांनी सहकार विभागाला दिले आहे.
👉Citizens Pension Scheme 2024 | मोठी बातमी ! आता या नागरिकांना दरमहा 11 हजार रुपये राज्य सरकार देणार ; GR आला👈
त्यामुळे या 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी महाआयटी, महाऑनलाइनचे अधिकारी, वित्त विभागाचे सचिव, सहकार विभागाचे सचिव, आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यातील अडथळे काढण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.