Nuksan Bharpai Yadi 2024 Maharashtra
Nuksan Bharpai Yadi 2024 Maharashtra :- नमस्कार शेतकरी बंधूंनो, अतिवृष्टी असो किंवा अवकाळी पाऊस असो यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असता शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येते.
राज्यात चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यांसारख्या कारणामुळे शेतीचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, यामध्ये शेतीपिकांचे 33% पेक्षा जास्त झाले असल्यास शेतकऱ्यांना शासणाकडून मदत देण्यात येते.
अशातच राज्यात मार्च, एप्रिल, मे 2023 या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते, त्यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासणाकडून शासन निर्णय सुद्धा घेण्यात आले होते.
Nuksan Bharpai Yadi 2024 Maharashtra
तसेच मे 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी विभागीय आयुक्त नाशिक यांनी राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला होता, त्यानुसार मदत देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती.
👉Anandacha Shidha Gudi Padva 2024 | रेशन कार्ड धारकांना खुशखबर ! 100 रुपयात या 4 वस्तु मिळणार👈
त्यानुसार अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी मदत Nuksan Bharpai Yadi 2024 Maharashtra देण्यासाठी राज्य सरकारकडून एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 23 लाख 95 हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
शेतकरी मित्रहो ही मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत मिळणार असून नंदुरबार जिल्ह्यातील 54 शेतकऱ्यांना 5 लाख 56 हजार रुपये, जळगाव जिल्ह्यातील 1138 शेतकऱ्यांना 1 कोटी 27 लाख 89 हजार रुपये आणि अहमदनगर जिल्ह्यातील 891 शेतकऱ्यांना 90 लाख 50 हजार रुपये इतकी मदत दिली जाणार आहे.