Sanman Dhan Yojana 2024 | राज्यातील या कामगारांना योजनेअंतर्गत दरवर्षी रु. 10,000/- मिळणार ; GR सुद्धा आला.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Sanman Dhan Yojana 2024

Sanman Dhan Yojana 2024

Sanman Dhan Yojana 2024 :- नमस्कार मित्रहो, राज्य शासनाकडून राज्यातील पात्र कामगारांना एका योजनेअंतर्गत दरवर्षी रु.10,000/- देण्यात येणार आहे, तर मित्रहो आजच्या या लेखात पात्रता काय, कोणत्या कामगारांना या योजनेचा फायदा होणार ते आपण बघणार आहोत.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करीता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनीयम 2008 च्या कलम 11 मध्ये “वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील,” अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे.

तरी सद्य:स्थीतित शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, दिनांक 8 ऑगस्ट 2014 , दि.05.01.2023 व दि.25.03.2023 अन्वये राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरुपात सन्मान धन योजना 2022 राबविण्यासाठी प्रतीवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Sanman Dhan Yojana Maharashtra 2024

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत रूपये 10,000/- एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डिबीटीव्दारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

Sanman Dhan Yojana 2024

  • यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील.

👉Regular Crop Loan Waiver 2024 | राज्य शासनाचा मोठा निर्णय ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रु. 50000/- ची मदत.👈

  • लाभार्थ्याना अर्थ सहाय्य वितरीत करण्यापूर्वी Sanman Dhan Yojana 2024 सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त (असंघटित कामगार) कार्यालयाने खात्री करुन घेण्यात यावी.
  • अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्ट्टीकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपध्दतीबाबत आवश्यक ते आदेश निगर्रमित करावेत. त्यामध्ये उक्त अधिनीयमाच्या कलम 15(3) मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखाना देखील तंतोतंत लागू राहील, याचा उल्लेख करावा.
  • सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्ट्टीकोनातुन व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्ट्टीकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत (अपर कामगार आयुक्त/कामगार उपआयुक्त/सहाय्यक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी) अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे.
  • महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरीत करावा.
👉येथे GR पहा 

Avkali Nuksan Bharpai 2024

Leave a Comment