Xerox Machine And Silai Machine Application Last Date
Xerox Machine And Silai Machine Application Last Date :- नमस्कार मित्रहो, झेरॉक्स मशीन आणि सिलाई मशीनसाठी अर्ज सुरू झालेले असून या साठीची शेवटची तारीख काय आहे यासंदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत.
मित्रहो, झेरॉक्स मशीन आणि सिलाई मशीन अनुदान वाटप योजनेचा मुख्य उद्देश बेरोजगारांना रोजगार देणे हा आहे. सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली बघायला मिळत आहे, ही बाब लक्षात घेता समाज कल्याण विभाग, जालना यांच्यामार्फत हे वाटप सुरू केले आहे.
झेरॉक्स मशीन व सिलाई मशीन साठीचे अनुदान हे 100% अनुदानावरच आधारित आहे, आपण जर जालना जिल्ह्यांमध्ये राहत असाल आणि तुम्हाला झेरॉक्स मशीन व सिलाई मशीन पाहिजे असेल तर समाज कल्याण विभाग, जालना येथे अर्ज करावा लागेल.
Xerox Machine And Silai Machine Application Last Date
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती व मागासवर्गीय व्यक्ती लाभ घेऊ शकतो, सदर योजनेअंतर्गत सुरुवातीला दिव्यांग व्यक्तींचा विचार केला जाईल आणि त्यानंतर मागासवर्गीय व्यक्तींचा विचार केला जाणार आहे.
झेरॉक्स मशीन आणि सिलाई मशीन साठी अर्ज करण्याची शेवटची Xerox Machine And Silai Machine Application Last Date तारीख ही 31 मार्च 2024 असून संपुर्ण कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज समाज कल्याण विभाग, जालना येथे करायचा आहे.
झेरॉक्स आणि सिलाई मशीनसाठी लागणारे कागदपत्रे :-
- दिव्यांग प्रमाणपत्र
- आधारकार्ड
- ग्रामसभेचा ठराव
- जातीचा दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- रहिवासी दाखला
👉येथे अर्ज करा
हा अर्ज 31 मार्च 2024 पर्यंत करायचा आहे यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभाग, जालना येथून अर्ज मिळेल किंवा समाज कल्याण विभाग, जालना च्या आसपासच्या झेरॉक्स च्या दुकानातुण तुम्हाला अर्ज मिळेल.