Skymet Monsoon 2024 Prediction
Skymet Monsoon 2024 Prediction :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यातील जनतेसह शेतकऱ्यांची ओढ मॉन्सून 2024 कसा राहणार, देशात मान्सून चं कधिपर्यंत होणार, या वर्षी मान्सून कमजोर तर राहणार नाही असे असंख्य प्रश्न पडलेले आहे तर मान्सून 2024 संदर्भातला अंदाज स्कायमेट या हवामान अभ्यासक कंपनीने जाहीर केलेल्या आहे. तर आपण त्यासंदर्भातच या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रहो, स्कायमेट या संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार देशभरात मान्सून 2024 जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात (+/- 5%) 868 मि. मि. सामान्यता 102% राहण्याचा अंदाज आहे. यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये स्कायमेटने मान्सून 2024 सामान्य राहण्याचा अंदाज दिला होता.
Skymet Monsoon 2024 Prediction
स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह म्हणाले की अल-निनो वेगाने कमजोर पडत असून ला-निना ला पोषक वातावरण तयार होत आहे. आणि ला-निना नैऋत्य मान्सूनसाठी पोषक ठरणार असल्याच त्यांनी म्हटल आहे.
स्कायमेट संस्थेच्या अंदाजानुसार देशाच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात पाऊस चांगला राहणार असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्यात पासू चांगला राहण्याची शक्यता आहे. बिहार,झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल राज्यात जुलै, ऑगस्ट Skymet Monsoon 2024 Prediction महिन्यात पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मान्सून 2024 या हंगामात कोणत्या महिन्यात किती पाऊस होणार ?
👉Electricity Rate Hike | दुष्काळात शेतकऱ्यांना 12% पर्यंत वीज दरवाढीचा ‘शॉक’ ! कृषिपंपासाठी नवीन दर जाहीर
जून महिन्यात सरासरी पाऊस
⁕ सामान्य 50% पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 20% अधिक पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 30% कमी पावसाची शक्यता
जुलै महिन्यात सरासरी पाऊस
⁕ सामान्य 60% पावसाची शक्यता
⁕सामान्यपेक्षा 20% अधिक पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 20% कमी पावसाची शक्यता
आगस्ट महिन्यात सरासरी पाऊस
⁕ सामान्य 50% पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 20% अधिक पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 30% कमी पावसाची शक्यता
सप्टेंबर महिन्यात सरासरी पाऊस
⁕ सामान्य 60% पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 20% अधिक पावसाची शक्यता
⁕ सामान्यपेक्षा 20% कमी पावसाची शक्यता