Gharkul List 2024 Maharashtra
Gharkul List 2024 Maharashtra :- नमस्कार मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येकाचे स्वतचे घर असणे प्रत्येक नागरिकांचे स्वप्न असते. जे नागरिक स्वतचे पक्के घर बांधू शकत नाही अश्या नागरिकांसाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवित असते.
अशातच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंअंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1 व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. 2 ते 4 मधील तरतुदींनुसार जिल्हाधीकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, छ.संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 07.12.2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने दिनांक 08.12.2023 रोजीच्या आदेशान्वये प्रशासकीय मान्यता दिलेल्या छ.संभाजीनगर जिल्यातील 1546 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.6 येथील पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.
Gharkul List 2024 Maharashtra
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंअंतर्गत छ.संभाजीनगर जिल्ह्यातील 1546 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी
उपलब्ध करुन देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
मित्रहो, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/ घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 करीता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र 1546 घरकुल लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.