Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alert :- नमस्कार मित्रहो, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला असून त्यासंदर्भात आपण आजच्या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.
गेले काही दिवसापासून राज्यात काही भागात समाधानकारक पाऊस होत असून काही ठिकाणी अजूनही चांगला पाऊस झालेला नाही आहे. अशातच हवामान विभागाने पुढील 2 ते 3 दिवसासाठी हवामान अंदाज वर्तविला असून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट व येलो अलर्ट देण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढील 24 ते 36 तासात कमी दाबाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Maharashtra Rain Alert
पुढील 24 तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र ओडिसा राज्याच्या काही भागात सरकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कमी दाबाचा परिणाम स्वरूप पुढील 2 दिवस कोकण, पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुढील 24 तासासाठी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी अतिवृष्टि होण्याचा इशारा दिला आहे.
सोबतच अमरावती, वर्धा, नागपूर, पुणे, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यासोबतच यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अहमदनगर, कोल्हापूर या जिल्ह्यात पुढील 24 तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.