Soyabean Cotton Incentive 2024 | अखेर शासन निर्णय आला ! सरसकट हेक्टरी 5 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
79 / 100

Soyabean Cotton Incentive 2024

Soyabean Cotton Incentive 2024

Soyabean Cotton Incentive 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जर सोयाबीन/ कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून सोयाबीन/ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निधी वाटपासंदर्भात एक शासन निर्णय घेण्यात आला असून या संदर्भातच माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. 

मित्रहो, गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे सोयाबीन व कापूस पिकांच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्या शासनाच्या माध्यमातून खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा 2024-25 च्या अतिरीक्त अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. 

Soyabean Cotton Incentive 2024

त्यानुसार सदर अर्थसहाय्य देण्यासाठी 29 जुलै 2024 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना  0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.1000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टरी रु.5,000 (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

अर्थसहाय्य अदा करण्याकिरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रु.1548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रु.2646.34 कोटी अशा एकूण रु.4194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष :-

  • राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.1000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टरी रु.5,000 (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य अनुज्ञेय राहील.
  • राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप/पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र राहतील.

 

  • ई-पीक पाहणी ॲप/पोर्टल वर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमानातच परिगनणा  करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. 
  • सदर शेतकऱ्यांना आँनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे  शेतक-याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल.
  • सदर योजना फक्त सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील.

👉Gharkul List 2024 Maharashtra | घरकुल यादी आली ! वैयक्तिक घरकुल योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी जाहीर

शासन निर्णय पहा 

Leave a Comment