Weather Update | कोकण विभागाला रेड, ऑरेंज अलर्ट तर विदर्भाल येलो अलर्ट ; आज कोणत्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस ?

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100

Weather Update

Weather Update

Weather Update :- मित्रहो, गेले 24 तासात विदर्भ व कोकण विभागात चांगला पाऊस झालेला  बघायला मिळाला आहे. सोबतच मराठवाडा विभागात काही एक ठिकाणी हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला आहे. आजच्या या लेखात आज राज्यात कुठे पावसाची शक्यता आहे ते पाहणार आहोत.

हवामान खात्याने दिलेल्या महितीनुसार आज 18 जुलै 2024 रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना रेड, ऑरेज व येलो अलर्ट देण्यात आले असून विविध ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा खात्याने वर्तविला आहे.

Weather Update

आज 18 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला असून पुढील 24 तासात या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोबतच पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात सुद्धा आज मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

बुलढाणा, गोंदिया, नागपूर, अकोला, यवतमाळ, भंडारा, वर्धा, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

👉Ladki Bahin Yojana Update | लाडकी बहीण योजनेत पुनः 12 मोठे बदल ! नवीन GR आला.

Leave a Comment