Compensation Fund List 2024
Compensation Fund List 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तिमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते व मदत म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा देण्यात येते.
शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी राज्य सरकारने असाच एक शासन निर्णय (GR) काढून राज्यातील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये राज्यात जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
Compensation Fund List 2024
शासन निर्णय :-
जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 596 कोटी 21 लाख 95 हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजूरी दिलेली आहे.
सदर मदत जिरायत पिके, बागायत पिके, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे.
शेतकरी मित्रहो, सदर नुकसानीची मदत ही अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, पुणे, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.