Cyclone Alert For Maharashtra
Cyclone Alert For Maharashtra :- नमस्कार मित्रहो, राज्यातील वातावरणात सध्या मोठे बदल होताना बघायला मिळत असून अरबी समुद्रात एक कमी तिव्रतेचे चक्रीवादळ घोंगावत असून या वादळाचा राज्याला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अरबी समुद्रात गुजरात राज्याच्या किनारपट्टीजवळ कमी तिव्रतेचे चक्रीवादळ घोंगावत असून गुजरात राज्यात अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होत आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी पुरपरिस्तिथी पाहायला मिळत आहे.
अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या वादळामुळे राज्यात याचा परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार राज्यात उद्यापासून पुढील 4 ते 5 दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
Cyclone Alert For Maharashtra
यामध्ये दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी विदर्भातील पूर्ण जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा इशारा दिला आहे.
दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळणार असून वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.