Imd Alert For Maharashtra
Imd Alert For Maharashtra :- नमस्कार मित्रहो, राज्यात गेले काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुनः राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून ते ऑगस्ट महिन्याचा दूसरा हप्ता संपेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. अशातच गेले 6 ते 7 दिवसापासून बहुतांश जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली आहे.
दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी दुपारपर्यंत कडक उन्ह असताना अचानक वातावरणात बदल होऊन विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे.
Imd Alert For Maharashtra
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील 3 ते 4 दिवस मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र विभागात बहुतांश ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली, यवतमाळ, वाशिम,चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, बुलढाणा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली
जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, अहिल्यानगर, धाराशीव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.