IMD Monsoon Forecast
IMD Monsoon Forecast :- राज्यात पावसाचा धुमाकूळ चालू असून येत्या 24 तासात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.
हवामान विभागाने दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी पुणे, सातारा या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला असून जिल्ह्यातील बहुतेक भागात अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
सोबतच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, नाशिक, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, मुंबई, कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
IMD Monsoon Forecast
मित्रहो, दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये धाराशीव, लातूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा कुठलाही अंदाज देण्यात आला नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 दिवस विदर्भ, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.