IMD Rain Alert
IMD Rain Alert :- नमस्कार मित्रहो, राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत असून हवामान खात्याने पावसासंदर्भात नवीन अंदाज दिला आहे.
हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस राहणार असून काही ठिकाणी पाऊस थांबनार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सोबतच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित जिल्ह्यात वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.
दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी विदर्भातील पूर्ण जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
IMD Rain Alert
दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी रत्नागिरी, पुणे, सातारा, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सोबतच दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 9 ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने उघडिप घेतलेली पाहायला मिळणार असून ठाणे, रायगड, पुणे, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यातच फक्त हलका पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.
👉Soyabean Cotton Incentive 2024 | अखेर शासन निर्णय आला ! सरसकट हेक्टरी 5 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा