Monsoon Forecast | महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचं संकट ! येत्या 2 दिवसात या जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटिंग

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

Monsoon Forecast

Monsoon Forecast

Monsoon Forecast :- नमस्कार बंधूंनो, राज्यात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे, जून महिना हा सरासरी पेक्षा कमी पाऊस झालेला पण जुलै च्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. 

या होत असलेल्या पावसामुळे राज्यातील जनताच नाही तर शेतकरी सुद्धा मेटाकुटिला आले आहे. होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी सुद्धा शेतातील कामे करू शकत नाही व खूप दिवसापासून पिकांना सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Monsoon Forecast

गेल्या 3 ते 4 दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील पाऊसमान कमी झालेलं होत पण आता हवामान विभागाने कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज दिलेला आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान विभागाच्यामते दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोल्हापूर या जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून याठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, वाशिम, पालघर, नाशिक, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. सोबतच भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी संपुर्ण महाराष्ट्राला मुसळधार ते अतिमुसळधार इशारा दिला आहे. हवामान विभागाने सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर ही 4 जिल्हे वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांना रेड, ऑरेंज, येलो अलर्ट दिलेले आहे. 

👉Mukhyamantri Annapurna Yojana Update | मोफत 3 सिलेंडर योजनेचा GR आला ! कोणाला या योजनेचा फायदा होणार ?

Leave a Comment