Panjab Dakh Weather Update
Panjab Dakh Weather Update :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळत असून सध्या पावसाने विश्रांती घेतलेली बघावयास मिळत आहे.
राज्यात पावसाने विश्रांती घेतली असतानाच आता पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. त्यांच्यानुसार राज्यात विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
Panjab Dakh Weather Update
पंजाबराव डख यांच्यामते राज्यात पुनः 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाड्यात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 18 ऑगस्ट पासून जोरदार पावसाला सुरुवात होणार असून मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.
यवतमाळ, नांदेड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, लातूर, बीड, धाराशीव, हिंगोली, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर, या जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता असून वीजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात राहू शकतो असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे.