PM Kisan Link Fraud | पीएम किसान ची लिंक ओपन करताय ; तर बँक खाते होणार रिकामे ! वाचा काय बातमी आहेत ?

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100

PM Kisan Link Fraud

PM Kisan Link Fraud

PM Kisan Link Fraud :- नमस्कार शेतकरी मित्रहो, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारांच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असते. यामधीलच शेतकऱ्यांची पसंतीची व केंद्र सरकार द्वारा चालविली जाणारी योजना म्हणजे पीएम किसान योजना होय.

मित्रहो, केंद्र सरकारची ही योजना शेतकऱ्यांच्या चांगलीच पसंतीत उतरली असून आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 17 हप्ते (वार्षिक 6000/- रुपये) देऊन झालेले आहे. 

पण या पीएम किसान योजनेच्या नावावर समाज माध्यमांवर फसवेगीरी करणारी एक लिंक सध्या धुमाकूळ घालताना बघायला मिळत असून ‘Whatsapp Group‘ च्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुप वरती पाठविल्या जात आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

PM Kisan Link Fraud

यामध्ये PM Kisan या नावे एक APP व सोबत एक मेसेज फिरताना दिसत आहे. यामध्ये इंग्रजीमध्ये “Link par tap kar ke PM Kisan list me apna name check kar le nahi to pament nahi milega” या मेसेजसोबत ‘PM Kisan’ App ची लिंक फिरताना दिसत आहे. 

 

समजा आपण जर त्या लिंक वर क्लिक केले तर आपले व्हाटसप्प अकाऊंट बंद पडते व आपल्या व्हाटसप्प अकाऊंटचा अॅक्सेस हॅकर्स च्या हाती जातो म्हणजेच त्या लिंक वर जर आपण क्लिक केल तर आपल व्हाटसप्प अकाऊंट हॅक होते. 

आपल व्हाटसप्प अकाऊंट हॅक झाल्यानंतर आपल्या मोबाइलमध्ये असणाऱ्या सर्व व्हाटसप्प अकाऊंट धारकांना व व्हाटसप्प ग्रुपला सदर अॅप ची लिंक व वर दिल्याप्रमाणे मेसेज पाठविला जातो. त्यानंतर आपल्या अकाऊंटच्या माध्यमातून पाठविल्या गेलेल्या त्या लिंक वर क्लिक केल्यामुळे इतर व्हाटसप्प अकाऊंट हॅक होते. 

व याच माध्यमातून संपुर्ण मोबाईल हॅकहोणे, पैसे मागणे, बँक अकाऊंट संदर्भातली माहिती मागणे किंवा चोरने अश्याप्रकारच्या गोष्टी घडण्याची दाट शक्यता असते. व या माध्यमातून आपले आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. 

त्यामुळे अश्या लिंक क्लिक करणे टाळावे जर आपल्याला अश्या प्रकारची कुठलीही लिंक आल्यास ती लिंक पुढे कुणालाही पाठवू नका. 

आपल्याला जर पीएम किसान संदर्भात कुठलीही बाब करायची असल्यास अधिकृत वेबसाइटलाच भेट द्यावी किंवा सी. एस. सी. सेंटरला जाऊन पीएम किसान संदर्भात जे काही काम करायचे ते करावे. 

सोबतच पीएम किसान लाभार्थी यादी बघावयाची असल्यास या लिंक 👉https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx वर क्लिक करून पहावे.

👉Compensation Fund List 2024 | अवकाळी नुकसान भरपाई मंजूर ; या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई !

Leave a Comment