Rain Forecast | राज्यात गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा ! या जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट जाहीर

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
79 / 100

Rain Forecast

Rain Forecast

Rain Forecast :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात पुढील काही दिवस वीजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

राजधानीसह राज्यातील इतरही जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होताना पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. 

Rain Forecast

यामुळे बहुतांश जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून काल व आज दुपारनंतर काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भात पुढील काही दिवस वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

दरम्यान हवामान खात्याने दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी रायगड या जिल्ह्याला ऑरेंज दिलेला असून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नंदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देऊन येलो अलर्ट दिलेला आहे. 

सोबतच पुणे, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यात सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. 

👉Namo Shetkari 4th Installment | नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता ! शासन निर्णय आला ; आपले नाव लगेच तपासा

 

Leave a Comment