Weather Update Today | या जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात ! पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे ; इतक्या जिल्ह्यांना रेड अलर्ट

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Weather Update Today

Weather Update Today

Weather Update Today :- नमस्कार मित्रांनो, राज्यात वातावरणात मोठे बदल पाहायला मिळत असून गेले 2 दिवसापासून काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊन राहीला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यासाठी पुढचे 24 तास महत्वाचे असणार असून पुढील 24 तासात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

अरबी समुद्रात एक चक्रीवादळ घोंगावत असून देशाच्या पश्चिम किनारपट्टीपासून ते चक्रीवादळ दूर जात आहे पण बंगालच्या उपसागरात नव्याने तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. 

Weather Update Today

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

मित्रहो, आज दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी दुपारनंतर वातावरण तयार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सुद्धा पाऊस झालेला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना रेड, ऑरेंज अलर्ट देण्यात आले असून अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यावेळेस वीजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. 

दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच अमरावती, वर्धा, गडचिरोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, जालना, बीड, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

👉Monsoon Withdrawal 2024 | मान्सूनचा मुक्काम वाढला ! सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज

Leave a Comment