Nuksan Bharpai Maharashtra 2024
Nuksan Bharpai Maharashtra 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, आजच्या लेखात राज्यात ढगाळ वातावरण व पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसाणी संदर्भात मदतनिधी जाहीर झाला असून त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
सदर मदत ही ऑगस्ट 2024 या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ढगाळ वातावरण तसेच जुलै ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळपिकांच्या फळगळीमुळे झालेल्या नुकसानीस विशेष बाब म्हणून मदत देण्यात येणार आहे.
Nuksan Bharpai Maharashtra 2024
वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ऑगस्ट २०२४ या कालावधीत ढगाळ वातावरणामुळे संत्रावर्गीय फळपिकांच्या फळगळीमुळे झालेल्ह्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त, नागपूर यांनी रु.1084.98 लक्ष इतका
तसेच अमरावती विभागातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे फळगळीमुळे झालेल्ह्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त, अमरावती यांनी रु.15498.10 लक्ष इतका निधी मागणी केल्ह्यानुसार एकूण रु.16,583.08 लक्ष (अक्षरी रुपये एकशे पासष्ट्ट कोटी त्र्याऐंशी लक्ष आठ हजार फक्त) इतका निधी एक वेळची विशेष बाब म्हणून मदत देण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
शासन निर्णय पहा : इथे क्लिक करा