7/12 Utara New Update
7/12 Utara New Update :- नमस्कार शेतकरी मित्रहो, शेतीसंदर्भातला महत्वाचा दस्तऐवज म्हणजे ७/१२ (सातबारा) उतारा आहे. आता ७/१२ उताऱ्यात महसूल विभागाकडून मोठे बदल करण्यात आलेले आहेत. तर किती व कोणते मोठे बदल करण्यात आले आहेत ते या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
सातबारा उताऱ्यामध्ये महसूल विभागाकडून तब्बल ५० वर्षानंतर ११ मोठे बदल करण्यात आलेले आहेत. व ते ७/१२ उताऱ्यामध्ये लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत.
7/12 Utara New Update
७/१२ उताऱ्यामध्ये काय बदल झाले आहेत ?
✅सातबारा उताऱ्यामध्ये आता गाव नमूना ७ मध्ये गावाच्या नावासोबत कोड क्रमांक असणार.
✅लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र स्वतंत्रपणे दाखविले जाणार.
✅शेतीसाठी ‘हेक्टर आर चौरस मिटर’ तर बीनशेतीसाठी ‘आर चौरस मिटर’ नवीन मापन पद्धत वापरली जाणार.
✅सातबारा मध्ये यापूर्वी ‘इतर हक्क’ मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसणार.
✅आता सातबारा उताऱ्यामध्ये मृत व्यक्ती, कर्जबोजे आणि ई-कराराच्या नोंदी कंसात दर्शविण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाणार.
✅फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी ‘प्रलंबित फेरफार’ स्वतंत्र रकाणा असणार.
✅आता सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाणा तयार केला जाणार.
✅सातबारा उताऱ्यामध्ये आता दोन खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेष असणार त्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येणार.
✅आता गट क्रमांक सोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकाण्यात शेवटी दाखवली जाणार.
✅बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मिटर’ हेच एकक, जोडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आले आहेत.
✅बिनशेतीच्या सातबारा उताराच्या शेवटी आता क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार.