Maharashtra Budget 2025
Maharashtra Budget 2025 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्याचा अर्थसंकल्प दरवर्षी मार्च महिन्यात सादर करण्यात येत असतो व अर्थसंकल्पात विविध योजनांची घोषणा करण्यात येत असते. सन 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प आज दिनांक 10 मार्च 2025 रोजी राज्याचे अर्थमंत्री श्री. अजित पवार यांनी विधानसभेत मांडला आहे.
या अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणा करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ते आपण पाहणार आहोत.
Maharashtra Budget 2025
1. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा- 21 जिल्ह्यांतील 7 हजार 201 गावांमध्ये राबविण्यात येणार-त्यासाठी 351 कोटी 42 लाख रुपये नियतव्यय
2. “कृत्रिम बुध्दिमत्ता” तंत्रज्ञानाचा शेतीक्षेत्रात वापर – पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा – दोन वर्षात ५०० कोटी रुपयांचा निधी
3. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 818 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किंमतीची एकूण 1 लाख 48 हजार 888 कामे हाती घेणार, अभियानातील सर्व कामे मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करणार
4. “गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार” योजना कायमस्वरुपी राबविणार
5. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज
6. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2 लाख 13 हजार 625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी 255 कोटी रुपयांचा निधी
7. बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात 4 हजार 300 कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबविणार
8. शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे, यासाठी 27 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविणार
9. बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतूकीसाठी “बळीराजा शेत व पाणंद रस्ते” ही नवी योजना सुरू करणार
10. 2100 कोटी रुपये किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प राबविणार