Monsoon 2025 India Update
Monsoon 2025 India Update :- मान्सून – एक ऋतू नाही, तर देशभरातील शेतकऱ्याच्या आशेचं प्रतीक ! 2025 मध्ये मान्सूनने सगळ्यांना आश्चर्यचकित करत सामान्य वेळेपेक्षा 8 दिवस आधी केरळमध्ये आगमन केलं. भारतीय हवामान विभागानुसार 24 मे 2025 रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून त्याचा वेग अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे दिसते.
सध्या मान्सून कुठे पोहोचला आहे?
मान्सूनने केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक व ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आपली हजेरी लावली आहे. काही भागांत हलकासा पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला आहे. कोकण व गोवा भागात देखील मान्सूनचे सुरुवातीचे वारे व ढगांची दाटी दिसून येत आहे.
Monsoon 2025 India Update
महाराष्ट्रात मान्सून केव्हा पोहोचेल?
- हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 30 मे ते 5 जूनदरम्यान मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे.
- कोकण, मुंबई, पुणे, नाशिकसह मराठवाडा आणि विदर्भातही जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.
पुढे कुठे आणि किती पावसाचा अंदाज आहे?
- 24 ते 28 मे दरम्यान: कोकण, गोवा, केरळ, कर्नाटक या भागात मुसळधार पावसाचा अलर्ट.
- 28 मे नंतर: दक्षिण गुजरात, विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
- बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या गतीला चालना देईल.
शेतकऱ्यांसाठी सुवार्ता !
यंदा मान्सून वेळेआधी आल्यामुळे खरीप हंगामासाठी पेरणीसाठी योग्य वेळ उपलब्ध होणार आहे. हवामान विभागाने सर्वसाधारणपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे पिकांची उत्पादकता वाढू शकते.