Nuksan Bharpai List 2024 | नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर ; शासन निर्णय आला

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Nuksan Bharpai List 2024

Nuksan Bharpai List 2024

Nuksan Bharpai List 2024 :- राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते.

त्याप्रमाणे विभािीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने वेळोवेळी निधी वितरीत करण्यात आला आहे. तथापी कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले होते.

त्यामुळे शेतीपिकांच्या व इतर नुकसानीसाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाने सर्व विभागीय आयुक्त यांचे कडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार वर नमूद दि.05.06.2023 च्या शासन निर्णयाव्दारे रु.40170.70 लक्ष इतक्या रक्कमेच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

तथापी त्यानांतरही सर्व विभागीय आयुक्त यांचेकडुन संदर्भाधीन क्र.7 ते 31 येथील पत्रान्वये प्राप्त झालेले निधी मागणीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.

Nuksan Bharpai List 2024

हे प्रस्ताव मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या दि.02.11.2023 रोजी झालेल्या बैठकीत निर्णयार्थ ठेवण्यात आले होते. या बैठकीतील निर्णयानुसार बाधितांना मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Nuksan Bharpai List 2024

सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरीता बाधितांना मदत Nuksan Bharpai List 2024 वाटप करण्यासाठी एकूण रू.10664.94 लक्ष (रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट्ट लक्ष चौऱ्यान्नव हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

👉Loan Waiver List 2024 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या शेतकऱ्यांची कर्जमाफी माफी झाली ; नवीन शासन निर्णय आला.👈

प्रचलित नियमानुसार शेती/ बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीकरीता मदत 33 टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना त्या-त्या कालावधीसाठी लागू असलेल्या विहित दराने व विहित मर्यादेत अनुज्ञेय राहील.

प्रचलित पध्दतीनुसार कृषी सहायक, तलाठी व ग्राम सेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्याना मदतीचे वाटप करण्याकरीता तहसीलदार यांनी विहित नमुन्यात संगणकीय प्राणलीवर तातडीने माहिती भरावी.

बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येईल. कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने अथवा निविष्ट्ठा स्वरुपात मदत देवू नये.

मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये याकरिता योग्य ते आदेश निगर्रमित करावेत.

👉शासन निर्णय इथे पाहा👈

👉Dushkal Nuksan Bharpai List 2024 | दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांतिल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार ; शासन निर्णय जाहीर !👈

Leave a Comment