IMD Orange Alert For Maharashtra | आज रात्री आणि उद्या या जिल्ह्यात तूफान वादळी पाऊस ; या जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जाहीर

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

IMD Orange Alert For Maharashtra

IMD Orange Alert For Maharashtra

IMD Orange Alert For Maharashtra :- मित्रहो, राज्यात बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना बघायला मिळत आहे, सोबतच गेल्या 2 दिवसापासून राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पाऊस सुरू आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस राज्यात विविध भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार आज रात्री आणि उद्या विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आले असून जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

IMD Orange Alert For Maharashtra

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

आज दुपारनंतर विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी पाऊस झालेला असून आज रात्री विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिट होण्याची शक्यता आहे, IMD Orange Alert For Maharashtra सोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे.

दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देऊन गारपीटीचा इशारा दिला आहे, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात सुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे.

👉Loan Interest Waiver List 2024 | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज माफ होणार ! शेतकऱ्यांची यादी जाहीर

Leave a Comment