Panjabrao Dakh Havaman Andaj
Panjabrao Dakh Havaman Andaj :- शेतकरी मित्रहो, राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असून काही ठिकाणी हलकी गारपिट बघावयास मिळत आहे. हवामान विभागाने सुद्धा पुढील काही दिवस राज्यात वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे.
9 एप्रिल पासून विदर्भ, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असून पुढे 15 एप्रिल पर्यंत राज्यात विविध जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे.
Panjabrao Dakh Havaman Andaj
सोबतच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात 18 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज दिला आहे. यादरम्यान सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात राहणार असल्याचा सुद्धा त्यांनी अंदाज दिला आहे.
पंजाबराव डख यांनी सांगितल्यानुसार 12,13,14 एप्रिल दरम्यान पावसाचा जोर जास्त राहणार असून यावेळेस Panjabrao Dakh Havaman Andaj मोठ्या प्रमाणात वीजांचा कडकडाट राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांची पिके काढायची आहे त्यांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन पंजाबराव डख यांनी केले आहे.