Farmer Loan Waiver 2024
Farmer Loan Waiver 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात पुढील काही महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. व या निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कर्जमाफी संदर्भात चर्चेने जोर धरला असून राज्यातील शेतकरी, विविध शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे.
गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे तसेच पिकांवर किडी व रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले होते व पिकांच्या बाजारभावांमुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
Farmer Loan Waiver 2024
शेतकरी मित्रहो, लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते व त्याप्रमाणे तेथील सरकारने 31 हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला मंजूरी दिलेली आहे. यामुळे तेथील तब्बल 40 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
राज्यातील शेतकरी, विविध शेतकरी संघटना व विरोधक यांची कर्जमाफीसंदर्भात मागणी जोर धरत असताना राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठी मागणी केली असून सरसकट 3 लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याच त्यांनी म्हटल आहे.
मंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी देशाचे प्रधानमंत्री व गृहमंत्री यांच्याशी याविषयी बोलावे असं सुद्धा त्यांनी म्हटल आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तातडीने विचार करून शेतकऱ्यांना 30 दिवसात कर्जमाफी द्यावी अशीही मागणी केल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.